अशी आहेत भरड धान्याच्या आधारभूत किमती….

भरड धान्याच्या आधारभूत खरेदी किमती जाहीर - जिल्हाधिकारी राहूल रेखावार

बीड,दि. 0४ :- (जि.मा.का) खरीप पणन हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्याचे (ज्वारी, बाजरी व मका) विहित विनिर्देश तसेच किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. याशिवाय आधारभूत किमतींचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरु करण्याकरिता व भरड धान्याची (ज्वारी, बाजरी व मका) खरेदी करण्यासाठी प्रमाणे पुढील प्रमाणे खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार Rahul Rekhawar यांनी दिले आहेत.

भैरवनाथ कृषी निविष्टा सर्वसाधारण सह.संस्था मर्या, बहीरवाडी ता.जि.बीड, गेवराई तालुका खरेदी विक्री संघ, गेवराई, धारूर तालुका खरेदी विक्री संघ, किल्लेधारुर, केज तालुका खरेदी विक्री संघ, केज, शेतकी विविध कार्यकारी सेवा सह सो.लि. शिराळ ता.आष्टी, सिंदफणा शेतीमाल पुरवठा व वि. सह संस्था मर्यालोणी ता.शिरुर.

भरड धान्याचे आधारभूत खरेदी दर फेएर एवरेज क्वालिटी (FAQ) दर्जासाठी पुढील प्रमाणे आहेत, सदर दरानेच शेतकऱ्याने आपल्या कडील भरड धान्य खरेदी केंद्रावर विक्री करावे.

ज्वारी(संकरीत)-रु.2620/- प्रती क्विंटल,

ज्वारी (मालदांडी)- रु.2640/- प्रती क्विंटल,

बाजरी – रु.2150/-प्रती क्विंटल,

मका – रु. 1850/-प्रती क्विंटल.

शेतकऱ्यांकडील भरड धान्य खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरु करण्यात आलेली आहे. त्याकरिता संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. त्याकरिता ऑनलाईन नोंदणी आधार क्रमांक व बचत बँक खाते क्रमांक नोंदणी करण्यात येत आहे. सदर ऑनलाईन खरेदी करिता पणन हंगाम 2020-21 साठी NeML NCDEX Group Company यांच्या https://ops.esamridhi.in या संकेतस्थळावर केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोंदणी करावी.

NeML Portal वर शेतकऱ्याचा जमिनीबाबतचा ऑनलाईन सातबारा उतारा (पीकपेरा सह) व नमुना 8-अ असणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड यांचेशी संपर्क करून त्वरित नोंदणी करावी, नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींनीसाठी व इतर माहिती करिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड यांचेशी संपर्क साधावा, जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र व मार्केट कमिटी यांनी देखील शेतकऱ्यांना नोंदणी करिता मदत करावी. सब एजंट संस्था यांना सुचित करण्यात येते कि शेतकऱ्यांच्या खरेदी, नोंदणी प्रक्रियेसाठी शक्य तेवढे संगणक उपलब्ध करुन द्यावेत व नोंदणीसाठी मदत करावी. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून Rahul Rekhawar करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!