दुर्दैवी… उघड्या रोहित्र्याच्या विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू.

गेवराई दि.30 नोव्हेंबर – शौचासाठी गेलेल्या युवकाचा उघड्या रोहित्र्याच्या विजेच्या धक्क्याने (electric shock) जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई (जि.बीड) तालुक्यात आज दि.30 मंगळवारी पहाटे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

(Unfortunately … the young man died due to the electric shock of open DP.)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई (Gevrai) तालुक्यातील सावरगाव येथील माजी सरपंच अण्णाभाऊ जाधवर यांचा मुलगा दत्तू आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास शौचासाठी घरातून बाहेर पडला. त्‍यानंतर तो परतून येत असताना त्याचा उघड्यावरील विद्युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाल्‍याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनास्‍थळी उघड्या रोहित्र्याचे फ्युज, वायर, आर्थिंग वायर सर्व उघडे असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे विद्युत तारेचा स्‍पर्श होवून दत्तू जाधवर यांचा मृत्‍यू झाल्‍याची चर्चा सुरू आहे. या प्रकाराची माहिती मिळताच गेवराई पोलिस (Police) घटनास्‍थळी दाखल झाले. त्‍यांनी घटनेचा पंचनामा केला. त्‍यानंतर मृतदेह (Dead Body) उत्तरीय तपासणीसाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या घटनेमुळे सर्व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!