बीड जिल्ह्यात गोळीबार, चाकू हल्ल्यानंतर आता तलवारबाजी; दोन जण गंभीर जखमी.

बीड दि.27 फेब्रुवारी – बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत गुन्ह्याचा आलेख चढला आहे. गोळीबार (Firing) , चाकू हल्ल्यानंतर आता तलवारबाजीची घटना घडली आहे. तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये जुन्या भांडणाची कुरापत काडून रात्री 1 च्या सुमारास झोपेत असताना तलवारीने सपासप वार केल्याची घटना घडली.
( Firing in Beed district, now fencing after knife attack; Two were seriously injured. )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात झोपलेला असताना रात्री एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ, शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे आले. त्यांनी समीर यांच्यावर झोपेत असताना तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार करून फरार झाले आहेत .
या घटनेमध्ये समीर च्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर सुध्दा गुढघ्यावर वार झाले आहेत. ही घटना रात्री सिरसदेवी येथील बेंडकी या ठिकाणी घडली. शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर समीर यांच्याकडे धावत जाऊन बघितले. यावेळी समीर हा जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मात्र त्याची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने शेख समीर याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. या प्रकरणी फोनवर पोलिसांना (Police) संपर्क केला असता त्यांनी सांगितले की जवाब घेण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे निघालो आहोत असे सांगितले आहे.व पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सिरसदेवी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.