माजलगाव प्रकरण… मुख्याधिकारी भोसले यांच्या भावाला अटक; इतर आरोपी मात्र अद्याप फरार.

5 / 100

माजलगाव दि.30 एप्रिल – माजलगाव शहरातील इदगाह मोहल्ला येथे जेसीबी चालकाच्या चुकीमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना दि.28 रोजी घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत मरणास कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. यातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.

माजलगाव शहर पोलिस (Police) ठाण्यात सय्यद निसार सय्यद नुर यांच्या फिर्यादीवरून माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, स्वच्छता प्रमुख जगदीश जाधवर, जेसीबी चालक महादेव आण्णासाहेब जाधव, स्वच्छता ठेकेदार, व जेसीबी मालक अशा पाच जनांविरोधात भादवि कलम 279, 304(A), 34, 134, 3 व 5 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव शहरातील मशिद परिसराची नगर पालिकेकडून स्वच्छता चालू असताना भिंत कोसळून सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना दि.28 रोजी सायंकाळी घडली होती. या घटनेत सय्यद ईकरा सय्यद निसार या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या मृत्यूला कारणीभूत (attempt to murder) असलेला जेसीबी चालकावर 302 चा गुन्हा दाखल करावा यासाठी या मुलीचे नातेवाईक आणि नागरिकांनी मुलीचा मृतदेह माजलगाव (Majalgoan) शहर पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले.

जोपर्यंत जेसीबी चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली होती. नातेवाईकांच्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह, नगर परिषदेचे स्वच्छता प्रमुख , जेसीबी चालक, स्वच्छता ठेकेदार आणि जेसीबी मालक अशा पाच जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी जेसीबीवर दगडफेक केली होती. चालक जेसीबी तेथेच सोडून पळून गेला होता. जेसीबीचा (JCB) चालक नवीन असल्यामुळेच त्याच्याकडून ही घटना घडल्याचे परिसरातून बोलले जात होते. दरम्यान, या प्रकरणी मुख्याधिकारी (Chief officer) विशाल भोसले यांचे बंधू जेसीबी मालक भाऊ श्रीरंग भोसले याला माजलगाव पोलिसांनी परांडा तालुक्यातून अटक (Arrested) केली आहे. इतर आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.

( Majalgaon case … Chief Officer Bhosale’s brother arrested; The other accused is still absconding.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!