बीड कोरोना अपडेट; जिल्ह्यात दोन बळी तर धारुर अंबाजोगाईत आढळले इतके रुग्ण.

बीड दि.1 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज केवळ 198 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 3 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 195 जण निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ धारुर व अंबाजोगाई तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर इतर सर्व तालुके शुन्यावर आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-2, आष्टी-0, धारुर-1, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज केवळ 3 आहे. संशयित रुग्णांची तपासणी 198 आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार रविवार 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोन कोरोना बळींची नोंद झाली. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2807 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 120 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज (रविवारी) दिवसभरात 1 हजार 172 नवे रुग्ण वाढले असून, 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 1 हजार 399 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 66 लाख 11 हजार 078 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 50 हजार 585 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.57 टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!