महाराष्ट्र

electricity  दंडाचा धाक दाखवून मीटर बदलीचा खेळ ? विज मंडळाचे दुर्लक्ष.

55 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.20- electricity शहरात सध्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून खाजगी यंत्रणेमार्फत मीटर बदली करण्यात येत आहेत. मात्र मीटर बदलने ऐच्छिक असताना सात हजार किंवा अधिक पैशांचा दंड द्यावा लागणार असल्याचा धाक दाखवून सर्वसामान्याच्या घरातील मीटर बदलले जात असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात सध्या वीज मंडळाचे मीटर बदलीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना नाहक दंड होत असल्यामुळे हे प्रकरण विधिमंडळातही चांगलेच गाजले. राज्य शासनाने सदर प्रकरणी मीटर बदलने बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले. धारुर शहर व तालुक्यात काही भागात सध्या मीटर बदलीचे काम सुरु आहे. हैद्राबाद येथील एका खाजगी कंपनीकडून सदरचे मीटर बदलण्यात येत आहेत. या कामासाठी खाजगी कंपनीने नामी शक्कल लढवली असून स्थानिकच्या विजकाम करणाऱ्या कामगारांना मीटरमागे ५० ते ८० रुपये देण्याची आमिष देत मीटर बदलण्याचा धडाका लावला आहे. मीटर बदलण्याची इच्छा नसणाऱ्या मालकांस मात्र सात हजार रुपये किंवा जास्त दंड होणार असल्याचे धाक दाखवला जात असून घरमालक नसतानाही सर्रास मीटर बदलली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. सदर प्रकाराची दखल वीज मंडळाने घ्यावी व वीज ग्राहकांना होणार भुर्दंड व त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे.

सध्या महाराष्ट्रात मीटर बदलीचे धोरण राज्य शासनाने घेतलेले आहे. मीटर बदलने बंधनकारक नाही कसलाही दंड घेण्याचेही आदेश नाहीत. शासन निर्णयानुसार कारवाई होत असून मीटर बदलीसाठी एक रुपयाही लागणार नाही. –  *गोकुळ मोरे* सहाय्यक अभियंता, मराविम, किल्लेधारुर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!