‘तिचा’ होणार राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्कार…

मुंबईः दि.३०- मुंबईतील भाईंदर येथील फारुक इस्माईल कुरेशी यांची कन्या आफशा (Aafsha) ही नुकतीच अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करून हिंदुस्थानात आली आहे. अशी कामगिरी करणारी अफशा ही मुस्लिम खाटीक (Khatik) समाजातील देशातील पहिली कन्या असून, तिच्या या यशाबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते अफशाचा सत्कार करणार असल्याचे मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील आणि विशेषतः राज्यातल्या मुस्लिम खाटीक, कसाई, कुरेश, कुरेशी बांधवांना अभिमान वाटेल, अशी मोठी कामगिरी अफशाने केली आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षण मुंबईतच घेतलेल्या अफशा (Aafsha) यांनी इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनची इंजिनीअरिंगची पदवी उच्चश्रेणीत संपादन केली आहे. त्यानंतर तिने कमर्शियल पायलट (Pilot) लायसेन्सचा कोर्स अमेरिकेतून पूर्ण करून पायलट (Pilot) बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. परदेशी नोकरीची संधी मिळत असतानाही मातृभूमीत राहून देशसेवा करण्याच्या ध्यासाने अफशाने हिंदुस्थानात नोकरी करण्याची मानसिकता बाळगली आहे. देशभरातील खाटीक (Khatik) समाजातून कुरेशी कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अफशाच्या देदीप्यमान यशाबद्दल तिच्यासह परिवारातील सर्वांचे, तिच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते अफशाचा सत्कार करणार असल्याचे मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!