बीड जिल्ह्याची द्विशतकाकडे वाटचाल; अंबाजोगाई, केज, आष्टीमध्येही कोरोना कहर;

बीड दि.13 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1691 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 181 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1510 जण निगेटिव्ह आली आहेत. आज अकव्या दिवशी बीड तालुक्यात 82 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 33, आष्टीत 18, केज व गेवराई तालुक्यात  प्रत्येकी 12 रुग्ण आढळून आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Beed district on its way to a double century; Corona havoc in Ambajogai, Kaij, Ashti too;)

1. बीड- 82                  7.माजलगाव-5
2. अंबाजोगाई-33          8.परळी-7
3. आष्टी- 18                 9.पाटोदा-2
4. धारुर-0                   10.शिरुर-5
5. गेवराई-12                    11.वडवणी-5
6. केज-12

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.13 शनिवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 181 वर गेली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या चार दिवसांत झपाट्याने वाढली आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाने पुन्हा 15 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली असून कडक निर्बंधाला सामोरे जावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!