धारुर तालुक्यातील माजी पोलिस पाटील सुंदर गवळी व अंजनडोहचे आदर्श शिक्षक दगडू सोळंके यांचे निधन.

किल्लेधारूर दि.23 जुलै – धारुर तालुक्यातील माजी पोलिस पाटील सुंदर गवळी व अंजनडोहचे आदर्श शिक्षक दगडू सोळंके यांचे शुक्रवारी रात्री वेगवेगळ्या कारणाने निधन झाले. यामुळे तालुक्यातील आम्ला व अंजनडोह गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर तालुक्यातील आम्ला गावचे अनेक वर्ष पोलिस पाटील म्हणून परिचित असलेले सुंदर दिगंबर गवळी (वय 70) गेले काही दिवस आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज आम्ला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंजनडोहचे आदर्श शिक्षक दगडू सोळंके यांचे निधन.
धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील आदर्श शिक्षक दगडू (गुरुजी) सोळंके (वय 75) यांचे शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. अंजनडोह गावातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या श्री विठ्ल शिक्षण संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. गावातील नूतन माध्यमिक विद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचे कार्य केले. शैक्षणिक क्षेत्रासह अध्यात्मिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ चिरंजीव शंकर दगडू सोळंके, (अध्यापक, ज्ञानराज विद्यालय, जवळबन) व तुलसीदास दगडू सोळंके हे (अध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय, अंजनडोह) तीन मुली, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.23) अंजनडोह येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
( Ex-police Patil Sundar Gawli of Dharur taluka and exemplary teacher Dagdu Solanke of Anjandoh passed away. )