बीड जिल्ह्यातील रविवारचे कोरोना अपडेट…. पहा तालुका निहाय संख्या.

बीड दि.18 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्येत सतत वाढ दिसत आहे. आज रविवारी जिल्हा प्रशासनाकडे 4954 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 174 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4780 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Sunday corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-26, अंबाजोगाई-0, आष्टी-52, धारुर-4, गेवराई-12, केज-11, माजलगाव-7, परळी-0, पाटोदा-20, शिरुर-32, वडवणी-10 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपला ॲड करा)
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चालू आठवड्यात संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तीन तालुक्यात निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. आष्टी, गेवराई व पाटोदा या तालुक्यात सोमवारपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 8 हजार 172 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण दिवसभरात कोरोनामुक्त झालेत. राज्यात दिवसभरात 8 हजार 950 रुग्ण बरे झाले आहेत. तर 124 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील आतापर्यंत 59 लाख 74 हजार 594 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या रिकव्हरी रेटमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झालीय. राज्याचा सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.28% इतका झाला आहे. तसेच राज्यात काल 124 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.04 % इतका आहे. राज्यात 1 लाख 429 सक्रीय रुग्ण आहेत.