सातारा डेपोमधील सहा शिवशाही बसेसला आग; तरुण पोलिसांच्या ताब्यात

सातारा: दि.१०- साताऱ्यात एसटी बस (Bus) डेपोमधील शिवशाही बसला एका तरुणाने आग लावल्याने यात सहा बसेस जळून खाक झाल्या आहेत. एका बसला लागलेली आग (Fire) पसरुन शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसेनही पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु त्याने आग (Fire) का लावली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या चौकशी अंतीच नेमंक कारण समजू शकेल. आगीच सहा गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आहेत. या आगीत शिवशाही बसेस जळून खाक झाल्याने एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बस (Bus) डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आग लावणाऱ्या तरुणास पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून आग लावण्याचे कारण अद्याप कळाले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!