passed away राधाबाई सिरसट यांचे निधन ; शोकाकूल वातावरणात झाले अंत्यसंस्कार.

किल्लेधारुर दि.8 जून – passed away किल्ले धारूर येथील प्रसिद्ध भाग्यश्री कंन्स्ट्रक्शनचे मालक बांधकाम उद्योजक संतोष बप्पा सिरसट यांच्या मातोश्री राधाबाई सिरसट यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी गुरुवारी दि. 8 गुरुवारी सकाळी 11 वाजता पाण्याची टाकी जवळ केज रोड येथे शोकाकूल वातावरणात शेकडोंच्या उपस्थितीत करण्यात आला. Radhabai Sirsat passed away; The funeral took place in a mournful atmosphere.
किल्लेधारुर Dharur शहरात अल्पावधीत नावारुपाला आलेल्या भाग्यश्री कन्स्ट्रक्शनचे मालक संतोष सिरसट व बाळू सिरसट यांच्या मातोश्री राधाबाई भागवत सिरसट (वय 65) यांचे दि.7 बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बौध्दवासी राधाबाई यांनी अपार कष्ट करुन कुटूंबाचे पालनपोषण केले. त्यांच्या कष्टाने व जिद्दीमुळे सिरसट कुटूंबाने नावलौकिक मिळवला. राधाबाई यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या सुन व बाळू सिरसट यांच्या पत्नी या धारुर Dharur नगर परिषदेच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या निधनामुळे शहरात दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर बौद्ध रितीरिवाजानूसार शेकडों जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.