महाराष्ट्राची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने… दिवसभरात 30 हजार बाधित; जगाच्या यादीत महाराष्ट्र अकरावा

मुंबई दि.22 मार्च – महाराष्ट्रात कोरोनाची पकड घट्ट होत आहे. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र (Maharashtra) पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे मानले जात आहे. रविवारी नव्या कोरोना बाधितांचा आकडा ३० हजार पार गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जागतिक पातळीवरील कोरोनाच्या यादीत महाराष्ट्र ११ व्या स्थानावर पोहोचला आहे.
(Maharashtra’s journey towards lockdown … 30,000 disrupted in a day; Maharashtra is eleventh in the world list)
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत विक्रमी वाढ होत आहे. आज राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. नव्या कोरोना बाधितांचा आकडा ३० हजार पार गेला आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यातील रिकव्हरी रेट (Recovery Rate) कमी होत असून मृत्यूदर वाढताना दिसत आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ३० हजार ५३५ नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले असून ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २४ लाख ७९ हजार ६८२ वर पोहोचली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील कोरोनाच्या यादीत महाराष्ट्र ११ व्या स्थानावर आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ३१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख १४ हजार ८६७ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८३ लाख ५६ हजार २०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख ७९ हजार ६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ६९ हजार ८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात आज रोजी एकूण २ लाख १० हजार १२० ॲक्टीव (Active patients) रुग्ण आहेत.