शिवनगर ताड्यांचे उपोषण पाचव्या दिवशी मागे
लेखी आश्वासनानंतर माघार

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) तालुक्यातील अंजनडोह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवनगर तांडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी सुरु झालेले उपोषण विंधन विहीरीचे अधिग्रहण व ताबडतोब कृती आराखड्याप्रमाणे विंधन विहीरीचे काम सुरु करण्यात येईल या लेखी आश्वासनावर आज दि.१६ शनिवारी पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले.
पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, कृती आराखड्याप्रमाणे बोअर घेण्यात यावे, गतवर्षीच्या अधिगृहणचे बील द्यावे या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते युवराज आडे व दत्ता आडे यांनी पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन देवुन शिवनगर तांड्यावरील सामाई मंदीराच्या मोकळ्या प्रांगणात बेमुदत उपोषन सुरु केले होते. शनिवारी पंचायत समीतीचे उपभापती प्रकाश कोकाटे यांनी पुढाकार घेवुन पंचायत समीती सभापतीचे पती हनुमंत नागरगोजे, गटविकास अधीकारी सोपान आकेले व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्याशी स्वतंत्र चर्चा करुन मार्ग काढला. त्याप्रमाणे विस्तार आधीकारी एस.पी.गिरी यांनी लेखी आश्वासन दिल्यावर दोन्ही उपोषणकर्त्यांनी युवराज आडे व दत्ता आडे यांनी नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, सभापतीचे पती हनुंमत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, रतन शेंडगे, सुधीर सोळंके, दयानंद आदमाने यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले.