पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली… पहा कुठले व किती आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटर येथे करण्यात आलेल्या ९ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ३ पॉझिटीव्ह रुग्ण तर काल पाठवण्यात आलेल्या १७ स्वॅब (Swab) पैकी ५ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. एक रुग्ण इतर ठिकाणी असे तालुक्यात आज ९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. भोगलवाडी येथे करण्यात आलेल्या ॲन्टीजन तपासणीत नित्रुड येथील एकाचा यात समावेश आहे. स्वॅब नमुन्यापैकी दोन अहवाल अनिर्णित आली आहेत.
कोविड सेंटरमध्ये आज ९ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ ३ पॉझिटीव्ह आल्या आहेत. तर काल पाठवलेल्या १७ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी ५ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. आज १५ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली. काल कमी झालेली रुग्ण संख्या आज पुन्हा वाढली आहे. नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण
१. ७० वर्षीय पुरुष, आरणवाडी, ता.धारुर
२. ३६ वर्षीय पुरुष, जाधव गल्ली, धारुर
३. २३ वर्षीय पुरुष, फकीरजवळा,ता.धारुर
स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले
४. ८४ वर्षीय पुरुष, वडगावकर गल्ली,धारुर
५. ३३ वर्षीय स्त्री, वडगावकर गल्ली,धारुर
६. १९ वर्षीय पुरुष, अहिल्या नगर, धारुर
७. २२ वर्षीय पुरुष, आयोध्या नगर, धारुर
८. ६२ वर्षीय स्त्री, उदयनगर , धारुर
९. ४० वर्षीय पुरुष, नित्रुड, ता.माजलगाव
यांचा समावेश आहे.