बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट; मृत्यू संख्येत वाढ, पहा तालुका निहाय संख्या.

बीड दि.30 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1018 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 8 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1010 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पाच तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत तर इतर तालुके शुन्यावर आहेत. मात्र शुक्रवारी मृत्यू संख्येत दोनने वाढ झाली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-1, केज-0, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गुरुवारी 10, शुक्रवारी 8 तर आज शनिवारीही 8 आली आहे. गुरुवारी 1 तर शुक्रवारी 2 जणाचा मृत्यू नोंदवण्यात आली. शुक्रवारी 13 जण कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2805 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 123 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) 1 हजार 338 नवे रुग्ण वाढले असून, 1 हजार 584 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वीस हजाराच्या खाली आली असून, सध्या 18 हजार 465 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 66 लाख 09 हजार 292 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 47 हजार 068 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.55 टक्के झाला आहे.