बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.25 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 5318 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 749 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4569 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही आज बाधितांची संख्या कमी आढळली असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

(Today’s corona update of Beed district; See Taluka wise statistics.)

आज बीड तालुक्यात 210 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 44 व आष्टी तालुक्यात 97 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 58 तर केजमध्ये 83 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आज बीड व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आली आहेत.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-210, अंबाजोगाई-44, आष्टी-97, धारुर-44, गेवराई-69, केज-83, माजलगाव-45, परळी-26, पाटोदा-45, शिरुर-50, वडवणी-22 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसांपासून हजाराच्या आत आहे. अजूनही ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. देशासह राज्यात दिलासादायक आकडेवारी असली तरी मृत्यू दर मात्र अधिक आहे. बीड जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध आज 25 पासून पुन्हा सहा दिवसांसाठी दि.31 मेपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

राज्याची कोरोना स्थिती ….
दरम्यान, राज्यात सोमवारी 22 हजार 122 रुग्ण आणि 361 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर, दुसरीकडे दिवसभरात 42 हजार 320 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.51 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर 1.59 टक्के आहे. सध्या राज्यात 3 लाख 27 हजार 580 रुग्ण उपचाराधीन आहेत, त्यात पुण्यात 48,258 मुंबईत 28,299, ठाण्यात 24,337 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!