या जिल्ह्याचे झाले नामकरण…. आता ओळख नर्मदापुरम या नावाने

भोपाळः दि.२०- मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्याचे नर्मदापूरम असे नामकरण करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान यांनी नर्मदा जन्मोत्सवच्या निमित्ताने सेठानी घाटावर झालेल्या कार्यक्रमात केली आहे. हा जिल्हा सुलतान हुशंगशहाच्या नावाने ओळखला जात होता. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात औरंगाबाद शहराच्या नामकरणासाठी उठलेले वादंग सध्या शांत झालेले असताना मध्यप्रदेश मध्ये शहराचे नाव बदलल्याची ही घटना घडली.

(Hoshangabad district will be now Narmadapuram)

मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान यांनी नर्मदा जन्मोत्सवच्या निमित्ताने सेठानी घाटावर कार्यक्रमात उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून होशंगाबादचे नामकरण करण्याची मागणी केली जात होती. त्याला चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्याचे नामकरण केले आहे. चौहान म्हणाले की २००८ पासून होशंगाबादचे नामकरण करून नर्मदापूरम करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. परंतु, तत्कालिन संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारने त्याला मान्यता दिली नाही. आताचे केंद्र सरकार नर्मदापूरम नावाला निश्चितच मान्यता देईल अशी आशा व्यक्त केली.

नवीन जिल्ह्याच्या नावाची घोषणा करताना चौहान म्हणाले या जिल्ह्यात लवकरच सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय उभारले जाणार आहे. त्याचबरोबर सभागृह, दसरा मैदान यांचा विकासही केला जाणार आहे. नर्मदाच्या किनाऱ्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, नर्मदेचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. तसेच नर्मदेच्या किनाऱ्यावर सिमेंटची जंगले उभी राहू दिली जाणार नाहीत असे ते म्हणाले. होशंगाबाद हा मध्य प्रदेशातील महत्वाचा जिल्हा आहे. त्याची उभारणी मांडूचा दुसरा राजा सुलतान हुशंगशहा घोरी याने पंधराव्या शतकात केली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनेक शहरांच्या नामकरणाची मागणी केली आहे.
(Hoshangabad district will be now Narmadapuram)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!