तुळजापूर सामूहिक अत्याचाराने हादरले… नववीच्या विद्यार्थीनीवर झाला अत्याचार

उस्मानाबाद: दि.३०- पंधरा दिवसांपुर्वी उस्मानाबाद (Osmanabad) शहरात एका गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape) केल्याची घटना घडली होती. यानंतर काल तुळजापूरच्या (Tuljapur) अणदूर येथील नववीच्या विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी नळदुर्ग पोलीस (Police) ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तुळजापूरच्या (Tuljapur) अणदूर येथील ही पीडित मुलगी नराधम आरोपी राहात असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. बुधवारी दुपारी तिघा नराधमांनी जबरदस्तीने तिच्या घरात घूसुन मुलीला बळजबरीने घरातून उचलून नेले. त्यानंतर पीडितेवर या तिघांनी सामूहिक अत्याचार (Gang Rape) केला. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी सागर घोडके, मुकेश भोरे, आनंद घोडके या नराधमांवर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक झाली असून तिसरा आरोपी आनंद घोडके फरार आहे. पोलिस (Police) त्याचा शोध घेत आहेत. पीडित अल्पवयीन तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात पंधरा दिवसांत अत्याचाराची ही दुसरी घटना उघडकीस आल्याने जिल्हा हादरला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!