किल्लेधारूर व गेवराई नगर परिषदेत असणार 20 नगरसेवक; कशी असेल प्रभाग रचना?

किल्लेधारूर दि.28 अॉक्टोंबर – महाराष्ट्रातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका (Municipal Corporation) आणि नगर परिषदांमधील (Municipal Council) निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळात (Cabinet) घेण्यात आला. यामुळे 17 सदस्य असलेल्या किल्लेधारूर  व 19 सदस्यांच्या गेवराई  नगर परिषदेत आता कमीतकमी 20 तर जास्तीत जास्त 25 नगरसेवक (councilors) असणार हे निश्चित झाले आहे. मात्र प्रभाग रचना कशी असेल याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत.

(Dharur Municipal Council will have 20 councilors; What will the ward structure look like?)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षस्थानी काल दि.27 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. याबैठकीत महापालिका व नगर परिषदांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सध्या महापालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य आणि कमाल 175 इतकी आहे. तर नगर परिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य तर कमाल 65 इतकी आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महापालिका तसेच नगर परिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महापालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्यांप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

अशी असेल नगर परिषदेतील सदस्य संख्या.
अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 40 व अधिक संख्या 75 हून अधिक नसेल.
ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून अधिक नसेल.
क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 20 व अधिक संख्या 25 हून अधिक नसेल.

किल्लेधारूर  व गेवराई नगर परिषदेत 20 सदस्य
बीड (Beed) जिल्ह्यात किल्लेधारूर  (Dharur) व गेवराई (Gevrai) या दोन नगर परिषदा क वर्ग नगर परिषदा आहेत. धारुर नगर परिषदेची सदस्य संख्या सध्या 17 इतकी आहे. नवीन निर्णयामुळे आता प्राथमिक माहितीनूसार आगामी काळात नगरसेवकांची संख्या 20 होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!