आज ४४ पॉझिटीव्ह; एकट्या बीडमध्ये २३

बीडः दि.२२- रात्री एक वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा ४४ आला असुन एकट्या बीड तालुक्यात तब्बल २३ सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत.
रात्री आलेल्या माहितीनुसार बीड तालुक्यात तब्बल २३, गेवराई तालुक्यात ८, परळी तालुक्यात ५, केज तालुक्यात ३ रुग्ण पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. याशिवाय शिरुर कासार तालुक्यात २ तर अंबाजोगाई, पाटोदा व माजलगाव तालुक्यात प्रत्येकी १ अशा ४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक संक्रमण वाढत असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड वाढला असून जनतेने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज आलेल्या ४४ पॉझिटीव्ह रुग्ण हे जिल्ह्यातील धारुर, वडवणी व आष्टी वगळता आठ तालुक्यातून आहेत.