दगडाने ठेचून महिलेचा खून; केज तालुक्यात खळबळ.

केज दि.22 जानेवारी – केज तालुक्यात एका गावात 60 वर्षीय वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे.
(Murder of a woman crushed by a stone; Excitement in Kaij taluka.)
घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत (Additional Superintendent of Police) यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटना केज (Kaij) तालुक्यातील नांदूरघाट येथे घडली असून मृत वृध्दा पारधी समाजाची आहे.
खून (Murder) कोणी केला? कारण काय ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच एएसपी पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस (Police) तपास करत असून पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून केज तालुक्यात गुन्हेगारीत वाढ झाली असून गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कुमावत यांनी धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत.