माझं गाव

धारुर घाटात तेलाचे टँकर पलटी; वाहतूक खोळंबली.

किल्लेधारूर दि.27 अॉक्टोंबर – आज बुधवारी (दि.27) पहाटे लातूरहून जालन्याकडे कच्चे खाद्यतेल घेवून जाणारे टँकर धारुर घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात (Accident) कसलीही हानी झालेली नाही परंतू यामुळे वाहतूक खोळंबली आहे.

(Oil tanker capsizes in Dharur Ghat; The traffic was light at this time.)

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र 548 सी वरील धारूर (Dharur) माजलगाव रस्त्यावर अवघड घाट (Ghat) आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन.एक्स. 4090 हे अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मिटर खोल कोसळला होता. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. यासोबतच सलग दोन दिवस साखर वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात झाले होते.

आज बुधवार (दि.27) रोजी पहाटेच्या सुमारास धारुर घाटात पुन्हा अपघात घडला आहे. कच्चे खाद्यतेल  घेवून जाणारा टँकर (क्र. एम.एच. 04- एफयू 8056) पलटी होवून अपघात घडला. या अपघातात जिवित हानी झालेली नाही. मात्र घाट रस्त्यावर तेल पडल्यामुळे वाहतूक खोळंबली. यापुर्वीही या रस्त्यावर मळी पडल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. या अपघातामुळे घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत येत आहे.

सतत होत असलेल्या अपघातामुळे धारुर घाट (Dharur Ghat) मृत्यूचा सापळा बनत आहे. घाट रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. अपघातस्थळी धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) नितीन पाटील यांनी भेट दिली. तेल पडल्यामुळे खोळंबलेली वाहतूक हळूहळू एका बाजूने पुर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!