शैक्षणिक

वैद्यकीय पुर्व परीक्षा NEET 2021 बाबत मोठी घोषणा; या तारखेला परीक्षा.

नवी दिल्ली दि.3 जून – वैद्यकीय क्षेत्रात पुढील अभ्यास करण्यासाठी योजना करत असणाऱ्याची विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे. एनटीएकडून (NTA) दि.2 जून बुधवारी (NEET 2021) कडून अर्ज दाखल करण्याची माहिती दिली आहे. नीट 2021 च्या अर्जासाठी एनटीएकडून अधिकृत www.ntaneet.nic.in या वेबसाईटवर अर्जाची लिंक जाहीर करणार आहे.

(Big announcement about Medical Pre-Exam NEET 2021; Exam on this date.)

NEET 2021 चे आयोजन एनटीएकडून MBBS\BDS सारखे कोर्स यासह अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा 1 ऑगस्ट 2021 रोजी घेतली जाणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी NEET 2021 साठी अर्ज करू शकतात. एकदा अर्ज भरल्यानंतर माहिती पुस्तिका, परीक्षेचे प्रारूप देखील प्रसिद्ध केले जाणार आहे. NEET आणि NTA च्या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

12 वीचे विद्यार्थी बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांसह NEET साठी मुख्य विषय म्हणून अर्ज करू शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा 12 वीचा निकाल अद्याप आलेला नाही किंवा त्यांनी खासगीमधून 12 वी (10+2) उत्तीर्ण झालेले NEET वर अर्ज भरू शकतात. अर्ज दाखल करतेवेळी वयोमर्यादा किमान 17 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावी. तसेच राखीव प्रवर्गातील विद्यार्थांसाठी वयाच्या अटीमध्ये 5 वर्षे सवलत देण्यात आली आहे.

NEET UG 2021 ची अधिकृत www.ntaneet.nic.in या वेबसाईटवर जात आपण अर्ज करू शकता. या वेबसाईट व्यतिरिक्त दुसऱ्या साईटवरून अर्ज केल्यास तो अर्ज ग्राह धरला जात नाही. याचबरोबर तुम्ही दिलेला मेल आणि मोबाईन नंबर योग्य असायला हवा तरच तो ग्राह्य धरला जातो.

NTA कडून दिलेला अर्ज भरत असताना तुमचा मेल आणि मोबाईल नंबर आलेल्या एसएमएसच्या माध्यमातून अर्ज भरला जाणार आहे. यावेळी अर्ज दाखल करताना परीक्षा फी भरण्यासाठी पर्याय असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!