मोठा निर्णय… स्थगित जागांची निवडणूक 18 जानेवारीला तर मतमोजणी 19 ला होणार.

मुंबई दि.17 डिसेंबर – ओबीसी आरक्षणामुळं (OBC reservation) राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या स्थगित केलेल्या जागांवरील निवडणुका 18 जानेवारीला तर 19 जानेवारी रोजी एकत्र मतमोजणी केली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) तयारी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

(Big decision … Election of postponed seats will be held on 18th January and counting of votes will be held on 19th.)

105 नगर पंचायत व 2 जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेल्या जागांवर आता 18 जानेवारीला मतदान तर 19 जानेवारीला मतमोजणी करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे आता या जागेवर देखील सर्वसाधारण जागेप्रमाणे निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळानं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, असा ठराव घेतलेलं पत्र राज्य निवडणूक आयोगाला आज देणार असल्याची ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Veddetiwar) यांनी माहिती दिली आहे.

येत्या तीन महिन्यांच्या काळात राज्य मागासवर्ग आयोगाकडे इम्पिरिकल डाटा (imperial data) गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या संबंधीचा निधी देण्याचे कबूल केल्याचीही माहिती त्यांनी दिली. राजकीयदृष्ट्या एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करून ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

निवडणुका एकत्रच घ्या- बाळासाहेब थोरात.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी कोर्टात जे जे करता येईल. ते आम्ही केलं. राज्य सरकार कुठेही कमी पडले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती केली आहे. सगळ्या निवडणुका एकत्रच घ्या हा आमचा आग्रह आहे. पण आयोग थांबणार नसेल तर आमचे उमेदवार तयार आहेत. उघड्यावर थोडीच सोडता येणार आहे. म्हणून आम्ही प्रचाराला लागलो आहोत, असं थोरात म्हणाले.

भाजपचं शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीला.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचं (BJP) शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यालयात गेले आहे. या शिष्टमंडळात पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा समावेश आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!