बीडमध्ये पुन्हा थरार … पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या

बीड: दि.३(प्रतिनिधी)- सतत या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एक थरारक घटना समोर आली.  तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात जाऊन थेट तलवारीने वार केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तलवारीने (Sword) केलेल्या हल्ल्यात (Attack) अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर बीडच्या (Beed) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे.

सदरील घटना दि.३० डिसेंबर रोजी घडली असून पोलिसांकडून आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर ही घटना उघड झाली. ३० डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास आरोपी पोपट बोबडे हा रामनगर येथील पीडित १७ वर्षीय मुलीच्या घराजवळ गेला होता. मुलगी किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी गेली होती. त्याच ठिकाणी दबा धरून बसलेला आरोपी पोपट बोबडे याने मुलीला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी घाबरलेल्या अवस्थेत धावत घरी पोहोचली. आरोपीने घरात जाऊन माझ्याशी का बोलत नाहीस म्हणून तिच्यावर तलवारीने (Sword) हल्ला (Attack) चढविला. त्याने थेट मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने वार चुकविल्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी पोपट बोबडे हा फरार झाला होता. दरम्यान मुलीवर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बीड (Beed) ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पीडित मुलीची विचारपूस करून गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या पथकाने तात्काळ आरोपीचा शोध घेवून पोपट बोबडे (२३) या महालक्ष्मी चौक, रामनगर येथे राहणाऱ्या तरुणास बेड्या ठोकल्यात. आरोपीस न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस (Police) करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!