धारुरचा मेन रोड बंद; आज २१ अहवालांची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) शहरात आज आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या रहिवासी असलेल्या मेन रोडचा वडगावकर यांचे घर ते काशिनाथ चौक हा मेन रोडचा भाग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला असून आज तालुक्यातील २१ स्वॅब अहवालांची प्रतिक्षा धारुरकरांना लागली आहे.
काल दि.२३ रोजी शहरातील आशोक नगर भागातील बाधित रुग्णाच्या गल्लीची संचारबंदी शिथिल करण्यात आली. तर आज आढळलेल्या बाधितामुळे मेन रोडचा वडगावकर यांचे घर ते काशिनाथ चौकाचा भाग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. यामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक बंद पडली. बाधिताच्या संपर्काचा शोध सुरु असुन बाधिताने उपचार घेतलेल्या रुग्णालयातील डॉक्टरसह कर्मचारी, रक्त व लघवी तपासणीस यांच्यासह कुटूंबियांना कोरोंटाईन करण्यात आले आहे. संध्याकाळ पर्यंत बाधिताच्या सहवासित व संपर्कातील लोकांची यादी येण्याची शक्यता आहे. सहवासितांची माहिती डॉ. मारुती लगड व डॉ. आमोल दुबे यांचे पथक घेत असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली. दरम्यान काल पाठवण्यात आलेल्या २१ थ्रोट स्वॅबची माहिती रात्री येणार असुन यात तालुक्यातील चोंडी येथील बाधिताच्या कुटूंबातील ६ व्यक्तींचा समावेश असल्याने धारुरकरांना या अहवालांची उत्कंठा लागून आहे.
कृपया बातमी जास्तीत जास्त शेअर करा…..