आजाराला कंटाळलेल्या शिक्षकाची आत्महत्या…

आडस दि.२५(प्रतिनिधी) आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहीत (suicide note) येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आडस येथे सोमवारी दि. २५ रोजी दुपारी उघडकीस आली.

सोमनाथ महादेव आकुसकर ( वय ५३ वर्ष ) रा. आडस ता.केज हल्ली मु. माऊली नगर अंबाजोगाई असे मयताचे नाव असून ते जिल्हा परिषदेत शिक्षक होते. सोमवारी सकाळी ते अंबाजोगाई येथून शेतात जाऊन येतो म्हणून आडस येथे आले. येथेच त्यांनी भुतबड्यांचा मळ्यातील भावाच्या शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. सदरील घटना सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली असून दुपारी ३ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आडस पोलीस (Police) दुरक्षेत्राचे जमादार अनंत अडागळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविला. मयत सोमनाथ आकुसकर यांच्या खिशात चिठ्ठी (suicide note) सापडली असून मी पोटाच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) करत आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहिले असल्याचे पोलीसांनी (Police) सांगितले. सोमनाथ आकुसकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!