आयपीएलचे उर्वरित सामने आता युएईमध्ये; बीसीसीआयचा मोठा निर्णय.

मुंबई दि.29 मे – कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे (IPL 2021) उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये (UAE) होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी याबाबतची माहिती दिली.
(The rest of the IPL matches are now in the UAE; BCCI’s big decision.)
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान सुरु असल्यामुळे आयपीएलला (IPL) सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय 4 मे ला घेण्यात आला होता, याबद्दल राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी अधिकृत घोषणा केली होती. यानंतर सतत उर्वरित सामन्याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यात होती.
आज दि.29 मे रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विशेष कार्यकारिणीचं आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार? याची उत्सुकता होती. अखेर BCCI ने हे सामने यूएईला होणार असल्याचं स्पष्ट केलं.
बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
टी-20 विश्वचषकाचं निर्णय 1 जूनला.
यंदाचा टी-20 विश्वचषक भारतात आयोजित करण्याचं नियोजन आहे. मात्र भारतात वाढत्या कोरोना संकटामुळे विश्वचषक भारतात घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय करण्यासाठी 1 जून रोजी बैठक होणार असून त्या बैठकीतच विश्वचषकाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.