बीड शेजारच्या उस्मानाबाद मध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव; राज्यात 31 रुग्ण.

उस्मानाबाद दि.15 डिसेंबर – मुंबई (Mumbai) आणि उपनगरांची चिंता वाढवल्यानंतर आता ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidharbha) झपाट्याने वाढ होत आहेत. बीड (Beed) शेजारीच लातूर (Latur) जिल्ह्यात ओमिक्रॉन रुग्ण आढळल्यानंर आता आज उस्मानाबाद (Osmanabad) आणि बुलडाणा जिल्ह्यात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
(Omicron infiltration in Osmanabad near Beed; 31 patients in the state.)
लातूर व उस्मानाबादमध्ये ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढळल्यानंतर आता संपुर्ण मराठवाडा आणि विदर्भाची चिंताही वाढली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातले निर्बंध (restrictions) आणखी कडक होण्याची शक्यता आहे. लातूरात एक तर उस्मानाबादमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. बीड जिल्हा प्रशासन यामुळे सतर्क झाले असून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
राज्यातल्या ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 31 वर
राज्यत तीन नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्याने आता ओमिक्रॉन बाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे. काल ही संख्या 28 वर होती, काल एकाच दिवसात 8 रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे.
उस्मानाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव
आता ओमिक्रॉनचा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. उस्मानाबादेत 2 रुग्ण आढळून आले आहेत. यूएईहून (UAE) बावी येथे आलेला रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने खळबळ पसरली आहे.
बावी यागावात कलम 144 लागू करण्यात आले असून गावात 5 रुग्ण आहेत, त्यापैकी दोन जणांचे अहवाल ओमिक्रॉन बाधित आले आहेत, तर इतरांचे अहवाल अजून प्रतिक्षेत आहेत. तर बुलडाण्यातही (Buldhana) एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे विदर्भाची चिंताही वाढली आहे. विदर्भातही नियम कडक केले जाण्याची शक्यता आहे.