प्रा.मुंडे यांच्या मागणीची खा.शरद पवार यांच्या कडून दखल

किल्लेधारूरः दि.२५ (वार्ताहर) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) विविध सेलच्या प्रमुख राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे यांनी भविष्यात पक्षवाढीसाठी पक्षात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल (विभाग) ची निर्मिती करावी अशी विनंती खा.शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली. याची दखल घेत पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना याबाबत सकारात्मक विचार करण्याची सुचना केली.

खा.शरद पवार, ना.अजीत पवार (Ajit Pawar), ना.जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ ते २३ डिसेंबर २०२० दरम्यान पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली. सदरील कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यान प्रा.ईश्वर मुंडे (Ishwar Munde) प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल यांनी भविष्यात पक्षवाढीसाठी आपल्या पक्षात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल (विभाग) ची निर्मिती करावी अशी विनंती खा.शरद पवार यांच्याकडे केली. या वेळी प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले, साहेब आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना अधिकारी कर्मचारी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मच्याऱ्यांना लागू झालेला वेतन आयोग, वेळोवेळीचे महागाई भत्ते समप्रभावाने त्याच दिनांकापासून राज्य अधिकारी कर्मचारी यांना लागू होतील असा शासन निर्णय घेतला. या प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या उन्नतीच्या अनेक निर्णयामुळे राज्यातील अधिकारी कर्मचारी आपणांवर खूष आहेत. त्याची उतराई म्हणून त्यांना आपणांस भक्कम साथ देवून आपणांसोबत काम करण्याची ईच्छा असते. अशा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना पक्षात सन्मानाने प्रवेश देवून त्याच्या जनमताचा लाभ घेतला तर पक्ष बळकट होईल. सदरील विनंती खा.शरद पवार (Sharad Pawar) यांना आवडली असून या बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील (Jayant Patil) यांना दिले असल्याची माहिती प्रा.ईश्वर मुंडे (Ishwar Munde) यांनी दिली. या वेळी राष्ट्रवादी (NCP) ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, प्रदेश उपाध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सचिन औटी, मिडिया सेल प्रमुख अतुल राऊत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!