धारुर निधन वार्ता; अखेर झुंज अपयशी…. मदतीला धावणाऱ्या पान विक्रेत्याचे निधन.

किल्लेधारूर दि.22 अॉक्टोंबर – शहरातील हनुमान चौकात पान विक्री करणाऱ्या शेख अनिस तांबोळी (44) यांचे दिर्घ आजाराने आज (दि.22) शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता निधन झाले. ते गेल्या दोन वर्षांपासुन कर्करोगाशी झुंज देत होते.
(Dharur’s death talks; In the end, the struggle failed …. The page seller who ran for help died.)
धारुर (Dharur) शहरातील बाराभाई गल्लीचे रहिवासी शेख अनिस महंमद तांबोळी हनुमान चौकात अनेक वर्षांपासुन खाण्याचे पान विक्रीचा (seller) पारंपारिक व्यवसाय करत होते. इतरांच्या कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होवून मदत करणारा तरुण अशी त्यांची ओळख होती. गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांना तोंडाच्या कर्करोगाचे (Cancer) निदान झाले होते.
अतिशय मनमिळावू व मदत करणाऱ्या स्वभावामुळे ते परिचित होते. आज शुक्रवार दि.22 रोजी सकाळी 6.30 वाजता त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी 2 वाजता गुलाबशाह कब्रस्तान चिरका येथे दफनविधी होणार आहेत.