सोमवारी ८ हजार ७४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद… आजचे कोरोना अपडेट.

मुंबई दि.9 मार्च – राज्यात सोमवारची आकडेवारी दिलासा देणारी आहे. शुक्रवार, शनिवार व रविवारची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढून आकडा 11 हजाराच्या पुढे गेला होता. सोमवारी 8 हजार 744 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 22 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(8 thousand 744 new corona patients registered on Monday … today’s corona update.)
महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचा मृत्यूदर हा 2.36 टक्के इतका आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 93.21 टक्के इतका झाला आहे. 9 हजार 68 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात 20 लाख 77 हजार 112 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 69 लाख 38 हजार 227 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 22 लाख 28 हजार 471 कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात 4 लाख 41 हजार 702 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 98 लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या 97 हजार 637 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. एकट्या मुंबईत आतापर्यंत 33 लाख 45 हजार 583 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत सध्या 9 हजार 373 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण (Active patients) आहेत. त्याचबरोबर ठाण्यात आतापर्यंत 28 लाख 63 हजार 351 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यात सध्या 10 हजार 397 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या 1 हजार 148 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण (Active patients) आहेत.
पुण्यात 19 हजार 30 कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 529 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या औरंगाबादमध्ये 4 हजार 472 अँक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या 12 हजार 219 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
(corona update)