आष्टी वगळता सर्व तालुके एक अंकी… बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.3 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2873 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 57 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2816 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-5, अंबाजोगाई-3, आष्टी-25, धारुर-4, गेवराई-2, केज-3, माजलगाव-3, परळी-2, पाटोदा-5, शिरुर-0, वडवणी-5 अशी आहे.
दरम्यान, राज्यात गुरुवारी 4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 81 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे.
राज्यात काल 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.