बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली; अजित पवार नवे सिईओ.

बीड दि.20 अॉगस्ट – बीड जिल्हा परिषदेचे (Beed ZP) मुख्यकार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) अजित कुंभार यांची मुंबई (Mumbai) महानगर पालिकेच्या सहआयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पुणे (Pune) येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(Beed Zilla Parishad Chief Executive Officer Ajit Kumbhar transferred; Ajit Pawar new CEO)
कोरोना काळात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अजित कुंभार यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जागी आता अजित पवार हे बीडचे नवे मुख्यकार्यकारी अधिकारी असतील.
राज्य सरकारने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS officers) शुक्रवारी दि.20 ऑगस्ट रोजी बदल्या केल्या असून यामध्ये अजित कुंभार यांचा समावेश आहे. बीड येथे येणारे अजित पवार हे पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी (जात पडताळणी) हे म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली आता बीडच्या सीईओ पदी करण्यात आली आहे.