राज्यात दिलासा मात्र बीड जिल्ह्यात आज वाढ… पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.25 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2132 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 237 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1895 जण निगेटिव्ह आहेत. आजही सर्व तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. संशयितांच्या तपासणी संख्या वाढली आहे. राज्यात व देशात मात्र मोठ्या संख्येत रुग्ण संख्या कमी झाली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-64, अंबाजोगाई-59, आष्टी-27, धारुर-1, गेवराई-6, केज-10, माजलगाव-33, परळी-21, पाटोदा-9, शिरुर-3, वडवणी-4 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज काल पेक्षा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात वाढलेली संख्या काल दोनशेच्या आत होती. सोमवारी 177 रुग्ण आढळले होते. आज अंबाजोगाई तालुक्यात 59, बीड तालुक्यात 64 रुग्ण तर माजलगाव तालुक्यात 33 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या सोमवारच्या नोंदीनूसार 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंद होवून एकुण मृत्यू संख्या 2847 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1606 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 15.19 झाला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे सोमवारी पहायला मिळाले आहे. मात्र ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येतील घट राज्यासाठी कुठे तरी मोठी दिलासाजनक बाब आहे.

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 28 हजार 286 नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या जवळपास 12,519 ने घटली आहे. तर राज्यात आज 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात राज्यात 21 हजार 941 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 86 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2845 ओमिक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे नागपूरमध्ये आहेत. नागपूरात 47 ओमिक्रान बाधित रुग्ण आढळले आहेत. यापाठोपाठ पुण्यात २८, पिंपरी चिंचवड 3 आणि वर्ध्यामध्ये 2 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा, आणि पुणे ग्रामीण भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. त्यापैकी 1454 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!