शैक्षणिक

NEET परिक्षेचा निकाल व ॲन्सर की बाबत मोठी अपडेट ; कसा पाहाल निकाल ?

49 / 100

नवी दिल्ली दि.26 अॉगस्ट – एनटीए
(NTA) द्वारे यावर्षी NEET परिक्षेचा निकाल लवकरच जाहिर होणार आहे. ( NEET UG 2022) परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे NEET UG 2022 परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer Key) व निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख जाहिर करण्यात आली आहे.
( Big update regarding NEET exam result and answer key; How to see the result? )

यावर्षी 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG 2022 परीक्षा दिली होती. ही परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती. परीक्षांचा निकाल साधारणपणे दिड महिन्यात जाहिर होतो. तत्पुर्वी NTA कडून परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer Key) जाहिर केली जाते. यंदा NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. यावर्षीच्या परीक्षांचा निकाल 7 सप्टेंबर रोजी जाहिर होणार असून 30 अॉगस्ट रोजी उत्तरपत्रिका (Answer Key) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उत्तर पत्रिका तपासण्यासाठी परीक्षार्थींना NTA च्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) neet.nta.nic.in भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावरून उत्तर पत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेच्या उत्तरपत्रिके बरोबरच प्रश्नपत्रिका देखील NTA द्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर, परीक्षार्थींना प्राथमिक विषयावर आक्षेप घेण्याची संधी मिळेल. परीक्षार्थींना आक्षेप घेतलेल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागल्यानंतरच निकाल जाहीर केला जाणार आहे.

अशा पद्धतीने उत्तरपत्रिका डाऊनलोड करा
1. सर्वात आधी परीक्षार्थीनी nta.nic.in या NEET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2. त्यानंतर उमेदवारांनी उत्तरपत्रिका या पर्यायी लिंकवर क्लिक करावे.
3. आता परीक्षार्थी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखचे अपडेट्स टाकू शकतात.
4. नंतर परीक्षार्थीनी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे.
5. आता परीक्षार्थी उत्तरपत्रिता डाऊनलोड करू शकतात.
6. त्यानंतर परीक्षार्थीनी उत्तरपत्रिकेची प्रिंट घ्यावी.

आक्षेप कसा नोंदवाल?
1. सर्वात आधी परीक्षार्थीनी nta.nic.in या NEET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2. त्यानंतर परीक्षार्थीनी उत्तरपत्रिका या लिंकवर क्लिक करावे.
3. त्यानंतर परीक्षार्थीनी लॉगिन तपशील टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे.
4. आता परीक्षार्थीनी कोणत्या प्रश्नासाठी आक्षेप घ्यायचा आहे ते निवडावे.
5. शेवटी परीक्षार्थीनी आक्षेप शुल्क भरून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!