विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाचा आईनेच काढला काटा; प्रियकरासह एक जण अटकेत.

जालना दि.16 सप्टेंबर – विवाहबाह्य संबंधात (extramarital affair) अडथळा ठरत असल्याने महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. अंबड पोलिसांनी (Police) महिलेच्या प्रियकराला आणि अजून एका आरोपीला अटक केली आहे.
(The mother of a six-year-old boy who was an obstacle in an extramarital affair was removed by her mother; One arrested with boyfriend.)
वडगाव येथील आरोपी महिला शीतल उघडे तिच्या भावाच्या उपचारासाठी अंबड येथे दवाखान्यात आली होती. तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्यदेखील होता. भावाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर औषध घेण्यासाठी ती दवाखान्याबाहेर आली. यावेळी तिने मुलाला एका ठिकाणी थांबवण्याचा बहाणा करत प्रियकर नवनाथ जगधनेच्या स्वाधीन केलं. यावेळी तिने प्रियकर अनोळखी व्यक्ती असल्याचं नाटक केलं.
यानंतर मुलगा हरवल्याचा बहाणा करत महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार (complaint) दिली. पोलिसांना यावेळी महिलेवरच संशय आला. तपासादरम्यान पैठण येथील नवनाथ जगधने याने मुलाचा खून (Murder) केल्याची माहिती मिळाली. पैठण येथून नवनाथ जगधने याला ताब्यात घेतले असता त्याने माझे व मयत मुलाच्या आईचे प्रेमसंबध असल्याची कबुली दिली.
आरोपी नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने मुलाला अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला आणि त्यानंतर हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांना मृतदेह (Dead Body) ताब्यात घेतला असून दोन्ही आरोपींना अटक (arrested) केली आहे. महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.