माजलगाव तालुक्यात दुहेरी अपघात; पाच जण जखमी.

माजलगाव दि.31 मे – माजलगाव तालुक्यातील कल्याण – विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) तालखेड फाट्यावर बोअरवेलची गाडी पलटी होवून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमीवर माजलगाव येथे उपचार करुन दोघांंना बीडला (Beed) पाठवण्यात आले आहे. सदर घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या पलटी झालेल्या वाहनाला एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली.
तालखेड फाट्याजवळून दोन कि.मी. अंतरावर राजस्थान पासिंगची आडव्या बोअरची गाडी क्रमांक आर. जे. 26 ई. ए. 0079 ही आडव्या बोअरवेलची गाडी माजलगावकडे येत असतांना अचानक पलटी झाली. गाडीमध्ये पाचजण होते. तिघांपैकी दोघेजण बाहेर निघण्यात यशस्वी झाले तर तीघे जण गाडी खाली अडकले. त्या व्यक्तीस काढण्यासाठी जेसीबी यंत्रणा मागविण्यात आली होती. यावेळी पोलिस कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तब्बल दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या व्यक्तीस बाहेर काढण्यात यश आले.
या तिघांवर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ.प्रविण वारकरी व येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून यातील जितु प्यास, हरपाल रंजु यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले व ईश्वर मयडा याच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्रीच्या अंधारात आणि रस्त्यावरच ही बोअरवेलची गाडी पलटल्याने उसाने भरलेला ट्रॅक्टर धडकल्याने घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. या दीहेरी अपघातामुळे (Accident) एक तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस (Police) व परिसरातील नागरिकांच्या मदतीने काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
( Double accident in Majalgaon taluka; Five people were injured. )