मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात तर मध्यप्रदेशात ५४ प्रवाशांसह बस कालव्यात कोसळली….

मुंबई/सतना: दि.१६- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री भीषण अपघात (Mumbai-Pune expressway accident) झाला असून या अपघातात पाच जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसातच्या सुमारास दुसरी अपघाताची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. सतनाकडे ५४ प्रवासी घेवून जाणारी बस ३० फुट खोल पाणी असलेल्या कालव्यात कोसळली. यातील ७ प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून इतरांचा शोध सुरु आहे.

सोमवारी मध्यरात्री ब्रेक निकामी झाल्याने एक कंटेनर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील चार वाहनांना धडकल्याने हा मोठा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर रात्री साडेबाराच्या सुमारास खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात तीन महिला, एक लहान मुलासह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. पाच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात कंटेनरसह दोन करा आणि एक टेम्पो आणि ट्रक या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. ते परतत असताना हा अपघात झाला. अपघातातील मृतांची नावे मंजू प्रकाश नायर (५८) रा. गोरेगाव मुंबई, डॉ. वैभव वसंत झुंजारे (४१) रा. नेरुळ नवी मुंबई, उषा झुंजारे (६३) रा . नेरुळ नवी मुंबई, वैशाली वैभव झुंजारे (३८) रा. नवी मुंबई, श्रिया वैभव झुंजारे (५) रा. नेरुळ नवी मुंबई अशी तर अपघातातील जखमींचे नावे स्वप्नील कांबळे (३०), रा. गोरेगाव मुंबई, प्रकाश नाहर (६५) रा. गोरेगाव मुंबई, अर्णव झुंजारे (१५) रा. नेरुळ नवी मुंबई व किशन चौधरी व काळूराम जाट गंभीर जखमी आहेत.
(Mumbai-Pune expressway accident)

मध्यप्रदेशात बस कालव्यात कोसळली

मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) भीषण अपघात (Accident) झाला असून ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आलं. सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात (Accident) झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंत सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मध्यप्रदेश चे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

54 passengers crashed in the canal

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!