नितिश कुमार ॲक्शन मोडमध्ये; दोन उपमुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळाची आज बैठक

पाटणा: दि.१७- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे केवळ नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी केल्यानंतर नितिश कुमार (Nitish Kumar) तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले असुन आज सकाळी अकरा वाजता कॕबिनेटची बैठक होत आहे.

बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी साडेचार वाजता राजभवन येथे पार पडला. रविवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सरकार बनवण्याचा दावा केला. या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थ-१ अणे मार्गावर एनडीएची संयुक्त बैठक झाली. त्यात नीतीश कुमार यांची सर्वसहमतीने एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे पर्यवेक्षक आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नावाची घोषणा केली. बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. नितीश कुमार यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. सुशील कुमार यांची भूमिका बिहार (Bihar) भाजपपुरती मर्यादित ठेऊन अन्य कुठली तरी जबाबदारी दिली जाऊ शकते. शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपचे चार, जदयुचे चार आणि दोन रालोआच्या घटक पक्षाचे सदस्य आहेत. बिहारमधील महाआघाडीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. काल भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी नितिश हे नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टिका केली होती. यानंतर नितिश कुमार हे ॲक्शन मोड मध्ये आले असुन आज अकरा वाजता मंत्रिमंडळाचे बैठक बोलावण्यात आली आहे. यात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!