Sessions Courts.. केज व धारुरसाठी स्वतंत्र जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन.

केज दि.18 जून – Sessions Courts केज व धारुरसाठी स्वतंत्र जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन आज दि.18 रविवार रोजी करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रविंद्र विठ्ठलराव घुगे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. Sessions Courts… Inauguration of separate District and Additional Sessions Courts for Kaij and Dharur.
गेली अनेक वर्षे केज येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची ( Sessions Courts ) मागणी केज वकील संघ व नागरीकांची होती. वाढते न्यायालयीन तंटे व जनतेची होणारी फरफट पाहता सदर मागणीस सकरात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळाला. धारुर येथेही वरिष्ठ स्तर न्यायालय सुरु करण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. आज दि.18 जून रविवार रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रविंद्र विठ्ठलराव घुगे यांच्या हस्ते जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे राजेंद्र गोविंद अवचट व न्यायमुर्ती रविद्रं मधुसुधन जोशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आनंद लक्ष्मीचंद यावलकर उपस्थित होते.
केज व धारुर Dharur येथील वरिष्ठ व सत्र प्रकरणासाठी सातत्याने अंबाजोगाई व माजलगाव येथे जावे लागत असे. मात्र केज Kaij येथे सुरु झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामुळे Sessions Courts प्रकरणाचा निपटारा होण्यास व जनतेची वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. नव्याने सुरु होत असलेल्या या सत्र न्यायालयात दि.19 सोमवार पासून केज व धारुर Dharur न्यायालयाच्या अंतर्गत प्रकरणाचे कामकाज सुरु होणार असल्याचे कळते. दरम्यान, केज Kaij येथे सुरु झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामुळे दोन्ही तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.