बीड कोरोना अपडेट; तीन तालुक्यात आढळले रुग्ण, पहा तालुकानिहाय स्थिती.

बीड दि.2 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 838 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 3 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 835 जण निगेटिव्ह आहेत. आज बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी आली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-1, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत घट दिसून आली आहे. बाधितांची संख्या सोमवारी 2, मंगळवारी 7, बुधवारी 10 तर आज 3 वर आली आहे. बुधवार (दि.1) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एका मृत्यूची नोंद होवून एकुण संख्या 2829 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 73 आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी 767 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून, 903 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या 7 हजार 391 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात 28 मृत्यूची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 36 हजार 425 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 84 हजार 338 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.