कोरोंना विशेष

धक्कादायक….धारुरचे मीटर दुप्पट; आज पाच पॉझिटीव्ह; जिल्ह्यात ५६

 

बीडः दि.३ आगस्ट- काल पाठवलेल्या २६ अहवाला पैकी धारुर शहरात पुन्हा पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात तीन सहवासित तर दोन नवीन रुग्ण आहेत. शहरात गेल्या तीन दिवसात सतत पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. आजचा वाढीचा वेग दुपटी पेक्षा जास्त आहे. आज जिल्ह्यात एकुण ५६ रुग्ण वाढले आहेत.

धारुर शहरात गेल्या तीन दिवासात सहा तर आज चार व तालुक्यातील घागरवाडा येथे एक असे पाच पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. आजच्या अहवालात काशिनाथ चौकात आर्य समाज मंदिराजवळ  एक ७६ वर्षीय पुरुष तर कसबा विभागातील मठ गल्लीत एक तरुण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. तर परवा आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या ३ सहवासितांचा समावेश आहे. यात स्वराज नगर कसबा विभाग येथील एक स्त्री व लहान मुलासह घागरवाडा येथील तरुणाचा समावेश आहे. जिल्ह्यात आज ३८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली. यात बीडमध्ये ११, परळीत १६, केज ६, अंबाजोगाई ७, गेवराई २, माजलगाव ८ व पाटोदा १  तर धारुरमध्ये प्रत्येकी पाच असे ५६ पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. धारुर शहरात वाढत असलेली संख्या चिंताजनक असुन बीड, परळी, अंबाजोगाई व गेवराई नंतर मोठा संसर्ग धारुरमध्ये होत असल्याचे दिसत आहे. याबाबतीत जनतेने सतर्कता बाळगुन सर्व नियम पाळत घरात राहणे सोयीचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!