परळी वैद्यनाथ मंदिराला आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; बीड जिल्ह्यात खळबळ.

बीड दि.27 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिराला 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने उडवून देण्याची एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली. यामुळे परळीसह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

(RDX threatens to blow up Parli Vaidyanath temple; Excitement in Beed district.)

12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिर (Parli Vaidyanath temple) संस्थानाकडे खूप पैसे आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्तांच्या नावाने आले आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र मिळालं आहे. पत्रामध्ये आरडीएक्सने (RDX) मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.

मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी परळी (Parli) शहर पोलिसांकडे हे पत्र दिले आहे. मंदिराला असे धमकीचे पत्र पहिल्यांदाच आले असे राजेश देशमुख यांनी सांगून याच्या चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे. 20 वर्षापूर्वी मंदिर उडवण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती. त्यानंतर या मंदिरात एस. पी .बीडने एक चारचा पोलिस गार्ड दिलेला आहे.

शुक्रवारी आलेले पत्र कोणी पाठविले? का पाठविले याची चौकशी व्हायला हवी, कडक पोलिस सुरक्षा द्यावी अशी मागणी राजेश देशमख यांनी एका पत्राद्वारे पोलीसांकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी चालू आहे . गुन्ह्याची नोंद परळी शहर पोलिस ठाण्यात (Police station) करण्यात आली आहे.

घाबरु नका… धनंजय मुंडे – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून जनतेने घाबरून जावू नये असे आवाहन केले आहे. सदरील प्रकारावर गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, डिजीपी, एसपी लक्ष देवून असून लवकरच आरोपीना गजाआड केले जाईल असे सांगितले. प्रभू वैद्यनाथ  हे दुख, अडचणी व आजारातून मुक्ती देणारे आहेत. अनादीकाळापासून परळीत विराजमान असून मंदिराची एक विटही इकडे तिकडे होणार नाही असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!