धारुरच्या कुटूंबियांची स्वॕब तपासणीसाठी रवानगी

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) येथील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटूंबियातील व्यक्तीनां आज दुपारी १.३० वाजता स्वॕब घेण्यासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. २४ तासानंतर या स्वॕब नमुन्याचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.
येथे आढळून आलेल्या व औरंगाबादहून परतलेल्या बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबातील ३८ व्यक्तींचे स्वॕब घेण्यात येणार आहेत. आज दि.२ मंगळवार रोजी दुपारी १.३० वाजता यातील दहा जनांना केज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या व्यक्तींना टप्प्या टप्प्यात रुग्णवाहिकेतून नेण्यात येत आहे. ३८ पैकी १९ केज येथे तर १९ जनांचे स्वॕब अंबाजोगाई येथून पाठवण्यात येणार आहेत. २४ तासानंतर या स्वॕबचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.