बिबट्याला शोधण्यासाठी सतरा टीम, सहा पिंजरे, ८० कर्मचारी…

बीडः दि.२९(प्रतिनिधी)- आष्टी (Ashti) तालुक्यात धुमाकुळ घातलेल्या नरभक्षक बिबट्यास (Leopard) शोधण्यासाठी वन विभागाने (Forest Deparment) प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली असून बिबट्याने मानवावर पुन्हा पुन्हा हल्ले करुन वन विभागा समोर आवाहन उभे केले आहे. याकामासाठी वन विभागाने (Forest Deparment) सतरा टिम, सहा पिंजरे लावून ८० तज्ञ कर्मचारी लावले आहेत.

पाच दिवसात दोघांचा बळी घेत तीघांवर हल्ला केलेल्या बिबट्याचा शोध सुरुच आहे. वन विभागाने (Forest Deparment) दिलेल्या माहितीनूसार, आष्टी (Ashti) तालुक्यातील सुरडी व किन्ही येथे मानवी हल्ला केलेल्या बिबट्यास (Leopard) शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून त्यामध्ये औरंगाबाद (Aurangabad), अमरावती (Amrawati), नांदेड (Nanded) व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीमचा समावेश आहे. एकूण ८० कर्मचारी यात सक्रीय आहेत. तसेच आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू असून, सहा पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत. आज आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!