बीड जिल्ह्याला आज दिलासा; मात्र बीड तालुक्यात चिंताच

बीड दि.8 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 855 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 89 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 766 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग सहाव्या दिवशी सर्वाधिक 40 कोरोना पॉझिटीव्ह बीड तालुक्यात आढळली आहेत. बीड पाठोपाठ आष्टी व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी 11 रुग्ण आढळून आली. आज केजमध्ये तीन तरा धारुर, वडवणी व पाटोदा तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Relief to Beed district today; But in Beed taluka there is only concern)

1. बीड- 40              7.माजलगाव-9
2. अंबाजोगाई-11     8.परळी-7
3. आष्टी-11             9.पाटोदा-0
4. धारुर-0             10.शिरुर-3
5. गेवराई-5           11.वडवणी-0
6. केज-3

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.8 सोवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आज दिलासादायक चित्र असले तरी तपासणीची संख्या कमी आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसात मोठी होती. संशयितांच्या चाचण्या कमी असल्याने आजची संख्या शंभराच्या आत आली आहे.

दरम्यान, राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाने 10 हजारचा आकडा ओलांडला आहे. आज राज्यात 11 हजार 116 पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. देशातली ही आजची सर्वोच्च संख्या आहे. बीड जिल्ह्याची परवाची संख्या 108 होती ती वाढून काल 122 झाली होती. जिल्ह्यातील कोरोना आकडा पाहता प्रशासनाने 31 मार्चपर्यंत सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस बंदचे आदेश दिले आहेत. आज धारुर येथे स्थानिक प्रशासनाने सोमवारचा बाजार भरवण्यास मज्जाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!