धक्कादायक … सलग दुसऱ्या दिवशी अंबाजोगाईत खुनाची घटना.

अंबाजोगाई दि.11 मार्च – कालची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अंबाजोगाई तालुक्यातील मौजे चिचखंडी येथील तरुणांचा डोक्यात दगड घालून खुन (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
( Shocking … Murder incident in Ambajogai for the second day in a row. )
अंबाजोगाई तालुक्यात लातुर (Latur) जिल्ह्यातील मौजे टाकळी शिराढोन येथील दिपक दगडे (वय 40) याचा मौजे साकुड शिवारातील मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर आडराणात गळा आवळून खुन केल्याची घटना काल उघडकीस आली होती. या घटनेस चोवीस तास उलटत नाही तोच दुसरी एक खुनाची घटना समोर आली आहे.
अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील मौजे चिचखंडी येथील बाबुराव विठ्ठल गडदे (वय 48) हे सकाळी सात वाजता गावाबाहेरच्या मंदीरात दर्शन घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडले मात्र चार वाजले तरी देखील घर परत आले नाहीत.
यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला. संध्याकाळच्या सुमारास गडदेवाडी शिवारात रोडपासुन शंभर मिटर अंतरावर नदीच्या पात्रात कोणीतरी अज्ञातांनी डोक्यात मोठा दगड घातलेला रक्तबंबाळ अवस्थेतील खुन केलेला मृतदेह आढळून आला.
मयत बाबुराव विवाहित असुन त्यांना पत्नी, दोन मुले आहेत. पैकी एक मुलगा लिंबा कारखाना उसतोडणीस गेलेला आहे. एक मुलगा शिक्षण घेत आहे. सदरील घटनेची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना (Police) मिळताच घटनास्थळी धाव घेवुन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती (SRTR) रुग्णालयात पाठवला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक (Police Inspector) वासुदेव मोरे पुढील तपास करत आहेत.