राजकीय

Market Committee राज्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा ; बीडमध्ये पुतण्याची काकाला मात.

54 / 100

बीड दि.29 एप्रिल – Market Committee राज्यात महाविकास आघाडीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Agricultural Produce Market Committee निवडणूकीत घवघवीत यश मिळवले असून बीड जिल्ह्यातही आघाडीने बाजी मारली आहे. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर 40 वर्षांपासून असलेली काकाच्या सत्तेस पुतण्याने सुरुंग लावत सत्ता काबिज केली आहे.

( Market Committee … Maha Vikas Aghadi’s supremacy in the state; Defeat nephew’s uncle in Beed.)

महाराष्ट्रात 147 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Market Committee निवडणुका घेण्यात आल्या. याची मतमोजणी आज होत असून आत्तापर्यंत आलेल्या निकालात राज्यभर महाविकास आघाडीची सरशी दिसून येत आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. हाती आलेल्या 122 निकालात भाजप 37, राष्ट्रवादी 30, काँग्रेस 26, ठाकरे गट 8, शिंदे गटाच्या ताब्यात 7 तर इतर 13 ठिकाणी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीकडे 64 तर भाजप सेना युतीकडे 44 बाजार समित्या आल्या आहेत.

बीड जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. केज वगळता इतर सर्व बाजार समित्यावर महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून आला. परळी व अंबाजोगाई बाजार समितीत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे खेचल्या आहेत. बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या चाळीस वर्ष ताब्यात असलेली बाजार समिती Market Committee पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी ताब्यात घेतली आहे. गेवराई बाजार समितीवर माजी आ. अमरसिंह पंडीत यांनी तर वडवणी बाजार समितीवर आमदार प्रकाश सोळंके यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले. केज बाजार समितीवर रमेश आडसकर यांनी विजय संपादन केले. जिल्ह्यात माजी मंत्री पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर यांना धक्का बसला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!